उत्कर्ष विद्या मंदिर क्रीडादिन कार्यक्रम

Bhartiya Utkarsh Mandal    08-Jun-2020
Total Views |
मनोऱ्यातील केंद्रबिंदू हा श्रीरामाच्या सेनेतील अंगादासारखा घट्ट पाय रोवून उभा राहिला तर संपूर्ण मनोरा यशस्वीरीत्या सादर होतो तसेच त्यावेळी जयजयकार करता येतो व विजयश्री अंगात संचारते असे मत डॉ. कुमार शास्त्री यांनी व्यक्त केले. उत्कर्ष विद्या मंदिरच्या क्रीडादिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते . ससा कासवाच्या गोष्टीतून करीत असलेल्या कामात सातत्य असेल तर यश नक्कीच मिळते असा कानमंत्र देखील त्यांनी विध्यार्थ्यांना दिला . या प्रसंगी भारतीय उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय दाणी यांनी विध्यार्थ्यांना शुभेछ्या दिल्या. या कार्यक्रमा दरम्यान रुमाल कवायत , डम्बेल्स, सूर्यनमस्कार , योगासने , नियुद्ध, योगचाप इत्यादी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. प्राथमिक विभागातील अमित गुप्ता याने वैयक्तिक गीत सादर केले. संचालन शर्वरी लडी हिने तर आभार प्रदर्शन प्राथमिक विभाग प्रधानाचार्य चेतन काळे यांनी केले.

b4_1  H x W: 0  
 
या प्रसंगी विद्या भारतीचे अखिल भारतीय सहसंघटन मंत्री काशीपती, भारतीय उत्कर्ष मंडळाचे सचिव अतुल मोहरीर, शाळा समितीचे अध्यक्ष यशवंत खारपाटे , विद्या भारती विदर्भ व देवगिरी प्रांत संघटक श्रीकांत देशपांडे, उपाध्यक्ष अनिल बाराहाते, शुभदा हरदास, शिरीष वटे , मार्गदर्शक रमाकांत कापरे, मुख्याध्यापक नितीन धनवंत , उपस्थित होते.