भारतीय उत्कर्ष मंडळ संचालित उत्कर्ष विद्या मंदिर खापरी नागपूर चा शालांत परीक्षा निकाल १०० टक्के

Bhartiya Utkarsh Mandal    08-Jun-2020
Total Views |
भारतीय उत्कर्ष मंडळ संचालित उत्कर्ष विद्या मंदिर खापरी ( परसोडी) नागपूर चा शालांत परीक्षा २०१४ च निकाल १०० टक्के लागला .
आशितोष मिसार हा विद्यार्थी ९३. ८० टक्के गुण घेवून शाळेतून प्रथम आला तर सर्वेश चांडक हा विद्यार्थी ९१. ४० टक्के गुण घेवून द्वितीय आला .
५३ विद्यार्थ्यांपैकी १३ विद्यार्थी प्राविण्य श्रेणी मध्ये, ३० विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये तर १० विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
विशेष म्हणजे आशितोष मिसार या विद्यार्थ्याला संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत.
या निकालामध्ये अरविंद गुप्ता याला ८९. ४० टक्के गुण, कु. संज्योक्ता वानखेडे हिला ८७. ८० तर मिताली गायकवाड हिला ८१ टक्के गुण प्राप्त झाले आहेत.
 
या निकालाचे श्रेय मुख्याध्यापक श्री नितीन धनवंत , शिक्षक श्री चेडे, सौ . कुलकर्णी , सौ. डांगोरे , सौ . धनवंत , व श्री कांबळे यांना देऊन मा. सचिव श्री अतुल मोहरीर, शाळा समिती अध्यक्ष श्री खारपाटे , संस्थेचे अध्यक्ष श्री संजय दाणी , उपाध्यक्ष श्री. बाराहाते , श्री. शिरीषजी वटे , श्री . गिरीषजी खेर, यांनी सर्व शिक्षक , विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आहे.