उत्कर्ष विद्या मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

Bhartiya Utkarsh Mandal    08-Jun-2020
Total Views |
उत्कर्ष विद्या मंदिर केवळ शिक्षणच नव्हे तर सांस्कृतिक अध्यात्मिक विषयांचे धडे देणारे केंद्र आहे असे उद्गार श्री यशवंतराव खारपाटे यांनी काढले, उत्कर्ष विद्या मंदिरच्या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

b5_1  H x W: 0  
 
कार्यक्रमाचा प्रारंभ गणेश नृत्याने झाला, विटी दांडू, आशियाना , गोंडी नृत्य, देवा श्री गणेशा, उदे ग अंबे उदे , शिव ताण्डव नृत्य, तसेच शिशु मंदिराने नाच रे मोरा, गोरी गोरी पान हि नृत्ये सादर केली . मुक नाटिका , शिवाजी महाराजांची नाटिका तसेच आवा चलति पंढरपूरम , ग्राहक हिताय ग्राहक सुखाय , मुर्ख भृत्य या संस्कृत नाटिका सादर करण्यात आल्या .
शालांत परीक्षा २०१३-२०१४ तसेच शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये प्राविण्य प्राप्त झालेल्या विध्यार्थ्याना पारितोषिके देण्यात आली , प्रथम आलेल्या आशितोष मिसार व द्वितीय आलेल्या सर्वेश चांडक यांस विविध पारितोषिके प्राप्त झाली .
या प्रसंगी विद्या भारतीचे अखिल भारतीय सहसंघटन मंत्री काशीपती, भारतीय उत्कर्ष मंडळाचे सचिव अतुल मोहरीर, शाळा समितीचे अध्यक्ष यशवंत खारपाटे , विद्या भारती विदर्भ व देवगिरी प्रांत संघटक श्रीकांत देशपांडे, उपाध्यक्ष अनिल बाराहाते, शुभदा हरदास, शिरीष वटे , मार्गदर्शक रमाकांत कापरे, मुख्याध्यापक नितीन धनवंत , उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन कु. शुभांगी हिंगे ने केले . आभार श्री रंदीप बिसने यांनी मानले .
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वच शिक्षकांनी परिश्रम घेतले.