भारतीय उत्कर्ष मंडळ द्वारा संचालित सरस्वती शिशु मंदिर कोतेवाडा गुमगाव येथे आज दि.12जुलै 2025 वार शनिवार रोजी शिशू मंदिर सत्र 2025-26 प्रथमदिनोत्सव कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय उत्कर्ष मंडळाचे विश्वस्त व पालक श्री हरीशजी सायरे आणि विद्यार्थी पालक मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात शिशूचे स्वागत औक्षवन करून करण्यात आले. प्रमुख अतिथींच्या व पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
सुरुवातीला परिपाठामध्ये राष्ट्रगीत आणि सरस्वती वंदना घेण्यात आली. तसेच शिशुनी बडबड गीत येरे येरे पावसा व ये ग ये ग सरी सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन तसेच आभार प्रदर्शन शिशु विभागातील शिक्षिका सौ नीलिमा ताई बावणे यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट शांति मंत्राने करण्यात आले.
“ज्ञानाच्या मंदिरात गुरूच्या सोबतीने” कागदावर ही ओळ लिहुन वर्ग शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले. तसेच शिशु व विद्यार्थी पालकांना खाऊ वाटप करण्यात आला.