भारतीय उत्कर्ष मंडळ संचालित सरस्वती शिशु मंदिर खैरी बुटीबोरी शाळेचा प्रथम दिनोत्सव कार्यक्रम

Bhartiya Utkarsh Mandal    02-Aug-2025
Total Views |

img
 
भारतीय उत्कर्ष मंडळ संचालित सरस्वती शिशु मंदिर खैरी बुटीबोरी येथे आज दिनांक 05/07/2025 वार शनिवार ला शाळेचा प्रथम दिनोत्सव कार्यक्रम घेण्यात आला.
सर्वप्रथम शाळेतील शिक्षक यांच्या हस्ते विदयार्थांचे औक्षवण करून विद्यार्थांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी पालक व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतीय उत्कर्ष मंडळाचे विश्वस्त व पालक श्री हरीशजी सायरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
परिपाठात शालेय प्रार्थना, राष्ट्रगीत आणि सरस्वती वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यानंतर शिशु विभागाच्या विद्यार्थ्यांनी योगासने आणि बडबड गीते आलू का चालू बेटा , व
एक कौवा प्यासा था सादर केली
तसेच विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री हरीश सायरे यांनी विद्यार्थी पालकांना बासुरी वर आधारित छोटी गोष्ट सांगितली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिशु विभाग शिक्षिका श्रीमती नीतू ताई ठाकरे दिदी यांनी केले.
कार्यक्रमाचा शेवट शांती मंत्राने करण्यात आला