भारतीय उत्कर्ष मंडळ द्वारा संचालित उत्कर्ष विद्या मंदिरच्या शालांत परीक्षा मार्च २०१६ मध्ये ९७. ५६ टक्के असे घवघवीत यश मिळाले . एकूण ४१ विद्यार्थीपैकी ४० विध्यार्थी उतीर्ण झालेत . त्यात ८० टक्के वरील गुणवत्तापूर्ण विध्यार्थी संख्या ७ आहे.
शाळेत प्रथम क्रमांक मिळवणारी शुभांगी हिंगे हीला ८७-६० टक्के गुण मिळाले . दुसरा क्रमांक मिळवणारी वैष्णवी कडवे हीने ८६. ८० गुण मिळवले . अक्षदा भागात तिसऱ्या स्थानावर असून तिला ८४. ८० टक्के गुण मिळाले .
अक्षदा भगत हिने संस्कृत मध्ये १०० पैकी १०० गुण प्राप्त केलेत तर वैष्णवी कडवे हिला ९९ तर रुचिका डेहनकर व शिवानी शहारेला ९७ गुण मिळाले.
प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान ८ विध्यार्थ्यांना मिळाला असून प्रथम श्रेणीत १४ विध्यार्थी उत्तीर्ण झाले .
या सर्व यशाचे श्रेय विध्यार्थ्यांनी संस्थेचे पदाधिकारी , शाळेच्या मुख्याध्यापिका , शिक्षक वर्ग तसेच विशेष मार्गदर्शन करणारे शिक्षक यांना दिले आहे.